¡Sorpréndeme!

अंधेरीतील शेर ए पंजाब कॉलनीत बिबटय़ा घुसला | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

रविवारी दुपारी अंधेरीत शेर-ए पंजाब कॉलनीमध्ये बिबटय़ा घुसला. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा बिबटय़ा एका रिकाम्या क्लासमध्ये घुसला होता. क्लासला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला.या दरम्यान घटनेची माहिती मिळाल्या नंतर मुंबई पोलीस आणि वन विभागाची टीम दाखल झाली आणि त्यांनी बिबटय़ाला जेरबंद केले. मुंबईतील भरवस्तीत बिबटय़ा आल्याने काहीकाळ या भागात घबराट आणि बघ्यांची गर्दीही होती. आरे कॉलनी शेर-ए-पंजाब कॉलनी जवळ असल्याने हा बिबटय़ा तिकडून आल्याची शक्यता आहे. वाढत्या नागरी करणामुळे बिबटय़ांचा अधिवास धोक्यात आला. त्यामुळे अन्न-पाण्यासाठी बिबटे मानवी वस्तीत घुसू लागले आहेत.संजय गांधी उद्यानातील प्राण्यांना अन्न व पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधासाठी हे प्राणी मानवी वस्तीत येतात.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews